Header Ads

Header ADS

रुधाजी देरकर यांचे वृद्धपकाळानेे निधन



सद्गुरू जगन्नाथ महाराज संस्थानचे संस्थापक अध्यक्ष रुधाजी पाटील यांचे वयाच्या 83 व्या वर्षी वृद्धपकाळाने नागपूर येथील रुग्णालयात बुधवारी पहाटे निधन झाले. माजी नगराध्यक्ष संजय देरकर यांचे ते मोठे वडील होते. रुधा पाटील हे किसान शिक्षण प्रसारक मंडळाचे ते अध्यक्ष होते.


          आपल्या युवावस्थेपासून त्यांच्या वेगाव या जन्मगावात ते संत जगन्नाथ महाराजांच्या सानिध्यात आले. त्यांचा संत जगन्नाथ महाराजांच्या वरोरारोडवरील श्री नंदेश्वर देवस्थानाच्या उभारणीत सिंहाचा वाटा आहे. आध्यात्मिक, सामाजिक तसेच व्यावसायिक क्षेत्रांत त्यांचे मोलाचे योगदान आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, अनेक मानसपुत्र व बराच मोठा आप्त परिवार आहे. त्यांनी अनेकांना आपले पितृप्रेम दिले. ते त्यांच्या कार्यामुळे जनमानसात लोकप्रिय होते. त्यांच्या पार्थिवावर गुरुवारी सकाळी 10 वाजता त्यांच्या भगतसिंग चौक येथील निवासस्थानावरून अंत्ययात्रा निघणार आहे.

No comments

Powered by Blogger.